'अमेरिकेन कॉलेज ऑफ फिजिशिअन' या डॉक्टरांच्या संघटनेने रक्तातील साखरेमध्ये असणारा 'एचबीए १सी' या घटकाचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांदरम्यान असायला हवे, असे स्पष्ट केले आहे. या संघटनेची डायबेटिसच्या संदर्भातील नियमावली प्रमाण मानणाऱ्या देशांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. भारतातील जीवन व आहारपद्धत, व्यायामाचा अभाव, ताणतणाव लक्षात घेता हे प्रमाण ७ टक्क्यांच्या आत हवे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील डॉक्टरांनी सुचवलेला हा मापदंड भारतात लागू पडत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे.