X Close
X
+91-9846067672

अयोध्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


नवी दिल्ली - बाबरी मशीद-राम जन्मभूमी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पक्षकार सोडून अन्य याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता. वादग्रस्त जमिनीचे तीन भागात विभाजन करण्यात यावे, असा निर्णय अलाहबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण १३ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाशी संबंधित ३२ याचिका फेटाळून लावल्या आहेत.  यामध्ये श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकांचा समावेश आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मुघल बादशाह बाबर याने अयोध्येत १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली होती. ही मशीद रामाचे मंदिर तोडून बांधण्यात आली असल्याचा दावा करत हिंदू कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२मध्ये ही मशीद पाडली होती.