X Close
X
+91-9846067672

कर्नाटकात लोकशाहीचा विजय, निवडणूक लढविण्याचा निर्णय अद्याप नाही - रजनीकांत P


चेन्नई - कर्नाटकात नाट्यमय घडामोडींनतर येडियुरप्पा यांना सत्तेवरून पायऊतार व्हावे लागले. कर्नाटकातील घडामोडींवर सुपरस्टार रजनीकांत यांनी भाष्य केले आहे. कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाला, असे रजनीकांत म्हणाले. 'रजनी पीपल्स फोरम'च्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीला रजनीकांत यांनी संबोधित केले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी रजनीकांत यांनी संवाद साधला. राज्यपालांनी बहूमत सिद्द करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देऊन एकप्रकारे लोकशाहीची थट्टा उडविल्याची टीका रजनीकांत यांनी केली. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. पक्षाची स्थापन अद्याप बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाईल असे रजनीकांत म्हणाले.