X Close
X
+91-9846067672

क्रेडिट कार्डद्वारे रेल्वे तिकीट


तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी अॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनसाठी (एटीव्हीएम) डेबिट, क्रेडिट कार्डची सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. 'क्रिस'तर्फे (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) गेल्या सात दिवसांपासून त्याची चाचपणी केली जात असून, त्यास यश आल्यास 'एटीव्हीएम'साठी डेबिट, क्रेडिट कार्डाचा वापर करून तिकीट मिळण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांप्रमाणेच एटीव्हीएम, जेटीबीएस, ऑनलाइनची व्यवस्था आहे. पण तरीही सर्वाधिक गर्दी तिकीट खिडक्यांवरच होत असल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी कायम आहे. त्यासाठी 'एटीव्हीएम'मध्ये डेबिट, क्रेडिट कार्डाच्या वापराबाबत 'क्रिस'ने पुढाकार घेतला आहे. 'एटीव्हीएम'च्या वापराचे प्रमाण सुमारे २५ टक्के असून, त्यात वाढ करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्डच्या वापराचा पर्याय परिणामकारक ठरेल, असा रेल्वेला विश्वास आहे.