X Close
X
+91-9846067672

तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना कार्यकर्त्यांकडून ‘दुग्धाभिषेक’ !


हैदराबाद - जीवाला जीव देणारा आणि नेत्यासाठी जीव घेणारा अशी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची ओळख सांगितली जाते. आपल्या नेत्याने दिलेला शब्द पाळल्यानंतर त्याची परतफेड करण्याचे अनेक प्रकार राजकारणात आहे. मात्र, तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांचे दाखविलेले नेत्यावरील प्रेम पाहून तुम्ही थक्क व्हाल ! तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष एस.मधुसूदन चारी यांना कार्यकर्त्यांनी घातलेला दूधाचा अभिषेक चर्चेचा विषय ठरला आहे. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाल्याच्या आनंदात त्यांनी चारी यांना अभिषेक घातला.  वारंगल जिल्ह्यातील श्यामपेटा ग्रामस्थांना आपल्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असावी अशी इच्छा होती. त्यांची इच्छा फलद्रुप झाली. या नव्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन चारी यांच्या हस्ते आज करण्यात आले.