X Close
X
+91-9846067672

नागरिकता विधेयक खतरनाक, मंजूर होण्यापासून रोखा - आसाम गण परिषद


गुवाहाटी - आसाम गण परिषदेने (एजीपी) भाजप अध्यक्ष अमित शाहांकडे नागरिकता संशोधन विधेयक - २०१६ संदर्भात आपला विरोध प्रकट केला आहे. हे विधेयक मूळ जनतेसाठी धोक्याचे असल्याचे म्हणत, ते मंजूर करू नये, असा आग्रहही एजीपीने केला आहे. केंद्राकडे करण्यात आलेल्या विनंतीत आसाम गण परिषदेने दावा केला आहे, की यामुळे आसाम करारातील तरतुदींचे उल्लंघन होते. या विधेयकाविरोधात आसाममध्ये निदर्शने होत आहेत. स्थानिक जनतेला शंका आहे, की यामुळे आसाम करारातील तरतुदींचे उलंघण होईल. आसाममध्ये एजीपी भाजपसोबत सत्तेत आहे.