X Close
X
+91-9846067672

पाण्याच्या निचऱ्यासाठी ‘आयआयटी’ची मदत


पावसाळा आणि मध्य रेल्वेवरील रखडणारी वाहतूक हा दरवर्षीचा चर्चेचा विषय. मध्य रेल्वेवरील सखल भाग आणि रुळांवर साचणाऱ्या पाण्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावते. ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. पाण्याचा निचरा, नाल्यांतील साचणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी आयआयटीचे सहाय्य घेतले जाणार आहे. त्यात, पाणी साचण्याच्या ६७ ठिकाणांवरही लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यातील ४० ठिकाणांकडे पुरेशी तजवीज करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारितील नालेसफाई, पाणी तुंबण्याच्या जागा आदींबाबत रेल्वे आणि मुंबई पालिकेकडून उद्या, शनिवारी रोजी संयुक्त पाहणी केली जाणार आहे. त्यापूर्वीच नालेसफाईचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. सखल भागातील रुळ वर उचलण्यात येत आहेत. स्थानक आणि पुलांकडे यापद्धतीने रुळ वर उचलता येत नसल्याने तिथे पाणी साचल्यास त्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी तयारी केली जाणार आहे.