रायपूर - छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने ती एका ट्रकवर जाऊन धडकली. या बस अपघातात बसमधील २२ पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती, पोलीस अधीक्षक कमलचोन कश्यप यांनी दिली. ही माहिती देताना कश्यप म्हणाले, की 'दंतेवाडा जिल्ह्याच्या नारेली घाटात हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या २२ पोलिसांना उपचाराकरता रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. या जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.'