X Close
X
+91-9846067672

भारत-नेपाळ सीमेजवळ गस्त घालणार नेपाळी ड्रोन


काठमांडू - भारत आणि नेपाळ सीमेवर गस्त घालण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. नेपाळचे गृहमंत्री राम बहादूर थापा यांनी ही माहिती दिली. ड्रोन वापरण्यासंबंधी असलेले नियम आणि अटी बदलण्याची गरज आहे. कारण भारत आणि नेपाळ सीमेवर ड्रोन वापरणे आता आवश्यक झाले असल्याची माहिती थापा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भारताकडून प्रत्येक किलोमीटरवर गस्त घालण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहे. परतू नेपाळकडून २५ किलोमीटरच्या अंतराने गस्त घातली जाते. त्यामुळे आम्ही ड्रोनचा वापर करणार असल्याचे थापा यांनी सांगितले. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये १८ हजार किलोमीटरची सीमा लागून आहे.