X Close
X
+91-9846067672

हवाई दलाचे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान खांबाला धडकले


नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ नावाचे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅडवर लँडिंग करत असताना लोखंडी खांबाला धडकले. यामुळे हेलिकॉप्टरला आग लागली. यावेळी हेलिकॉप्टरमधील चालकासह सहा जण सुरक्षित असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे. हेलिकॉप्टर एमआय-१७ गुप्तकाशी येथून सामान घेऊन केदारनाथला पोहोचले होते. लँडिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात सांगितले जात आहे.