X Close
X
+91-9846067672

भारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश


भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे. एएफआर आशिया बँक ग्लोबल वेल्थच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जगातील श्रीमंत देशांच्या सूचीत अमेरिकेचा पहिला तर भारताचा सहावा क्रमांक लागला आहे. यासाठी प्रत्येक देशातील खासगी मालमत्तांचा (बिगर सरकारी) विचार करण्यात आला आहे. यानुसार भारतामध्ये आठ हजार २३० अब्ज अमेरिकी डॉलर संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे, भारताने या सूचीत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स व इटलीवर आघाडी घेतली आहे. या खासगी मालमत्तेमध्ये स्थावरजंगम मालमत्ता, रोकड, शेअर्स, व्यावसायिक उत्पन्न आदीचा समावेश होतो. यात सरकारी महसुलाचा विचार करण्यात आलेला नाही. मोठ्या प्रमाणावरील उद्योगधंदे, उत्तम शिक्षणव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी, आरोग्यसुविधा, स्थावर मालमत्ता आदींमुळे भारताने हे स्थान पटकावले आहे. तसेच, येत्या १० वर्षांत यात दुपटीने वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

या सूचीत अपेक्षेप्रमाणे अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील खासगी मालमत्ता ही ६२ हजार ५८४ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक असून चीनमध्ये २४ हजार ८०३ अब्ज अमेरिकी डॉलरची खासगी मालमत्ता आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानमध्ये १९ हजार ५२२ अब्ज अमेरिकी डॉलरची संपदा खासगी मालमत्तेच्या स्वरूपात आहे.